Dighi : तोंडाला मास्क लावण्यास सांगितल्यावरून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

Cross complaint filed at Dighi police station allegedly for beating a person who asked to wear a mask

एमपीसी न्यूज – तोंडाला मास्क लावायला सांगितल्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री आठच्या सुमारास च-होली येथे घडली.

प्रदीप सुरेश तापकीर (वय 42, रा. च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रोहित चतुर्वेदी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची साथ सुरू असल्याने फिर्यादी प्रदीप यांनी आरोपी रोहित याला तोंडाला मास्क लावण्यास सांगितले. यावरून चिडून आरोपीने ‘तुला काय करायचं आहे, माझं मी बघेन’ असे म्हणत प्रदीप यांना शिवीगाळ केली.

एका धारदार वस्तूने प्रदीप यांच्या हातावर वार करून जखमी केले.याच्या परस्पर विरोधात रोहित श्रीलोकेश चतुर्वेदी (वय 44, रा. च-होली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रदीप सुरेश तापकीर, अनुज तापकीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाकडी वस्तूने तोंडावर मारून चतुर्वेदी यांना जखमी केले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.