Pimpri : IMA च्या डॉक्टरांनी दिला गाण्यातून कोरोना जनजागृतीचा संदेश

Doctors of Pimpri Chinchwad Bhosari branch of Indian Medical Association gave a message of corona virus awareness through a song.

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षेचे उपाय यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या (आयएमएपीसीबी) वतीने जनजागृतीचा व्हिडिओ बनविण्यात आला आहे. व्हिडिओच्या अभिनव संकल्पनेतून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारी घेऊन न घाबरण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

1957 साली प्रदर्शित झालेल्या प्यासा चित्रपटातील ‘सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये’ या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या सर्व डॉक्टरांनी मिळून
‘बुखार जैसे पाए, या सर्दी खासी आए
आजा प्यारे पास हमारे, काहे घबराए काहे घबराए’
हे गाणे बनविले आहे.

हे गाणं एका डॉक्टरांनी स्वतः गायलं आहे. त्या गाण्यावर इतर डॉक्टरांनी आपापल्या घरी किंवा दवाखान्यातच राहून अतिशय सुंदर पद्धतीने नृत्य करत, संदेश देऊन व्हिडीओ तयार केला आहे.

सर्व व्हिडिओ एकत्रित करून याचं सुंदर गाणं तयार केलं आहे. संस्थेने या निमित्ताने कोरोनाशी दोन हात करत या गाण्यातून सामाजिक संदेश देऊन दुहेरी भूमिका बजावली आहे.

गाण्याची संकल्पना अध्यक्ष डॉ. सुहास माटे, सचिव डॉ. सुधीर भालेराव यांची आहे. शब्दरचना डॉ. सुधीर भालेराव यांची आहे. तर डॉ. अनिरुद्ध टोणगावकार यांनी हे गाणं स्वरबद्ध केलं आहे. रेझोनन्स स्टुडिओच्या राजस चव्हाण व्हिडिओचे संकलन केले आहे.

अध्यक्ष डॉ. सुहास माटे, माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर, सचिव डॉ. सुधीर भालेराव, डॉ. माया भालेराव, उपाध्यक्ष डॉ. संजीव दाते, डॉ. विजय सातव, माजी उपाध्यक्ष डॉ. सुशील मुथीयान, कोषाध्यक्ष डॉ. ललित धोका, डॉ. स्वप्नाली धोका, माजी कोषाध्यक्ष डॉ. सचिन कोल्हे, डॉ. मनिषा डोईफोडे, डॉ. अर्चना जाधव, डॉ. संतोष आणि डॉ. दिपाली लाटकर, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मंदार डोईफोडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. सारिका लोणकर, डॉ. ज्योती देकाते, डॉ. संदीप पानसरे, डॉ. रितू व डॉ. दिनेश लोखंडे, डॉ. स्वाती व डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. दिपाली व अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. मनिषा व डॉ. संजीवकुमार पाटील आदींची यात भूमिका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.