Cyber News : ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त मिळणाऱ्या ‘या’ फ्री कूपन्स, गिफ्ट देणाऱ्या लिंकवर करू नका क्लिक

एमपीसी न्यूज: मोठमोठ्या हॉटेल्समध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त काही फ्री कुपन्स किंवा फ्री गिफ्ट कार्ड मिळत असल्याच्या लिंक समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. या लिंक फेक असून नागरिकांनी त्यावर क्लिक करून याला बळी पडू नये, असे आवहन मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.

काही मोठ्या हॉटेल्सच्या नावाचा वापर करून ह्या लिंक समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत. यामध्ये दर्शवलेल्या मोठमोठ्या सवलतींना नागरिक बळी पडू शकतात आणि त्यांची आर्थिक फसवणूकदेखील होऊ शकते. त्यामुळे अशा फेक लिंक व भरघोस सवलत देणा-या संदेशांपासून नागरिकांनी दूर राहावे.

तसेच या लिंक ओपन करून कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहितीही भरू नये, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याने केले आहे.

काही संकेतस्थळे आणि संदेश हे ताज हॉटेलच्या नावाने सवलती आणि गिप्ट कार्डस देत असल्याचे सांगत आहेत.

मात्र. ताज हॉटेल अशा कोणत्याही प्रकारच्या सवलती वा गिफ्ट कार्ड देत नसल्याचे ताज हॉटेलनेही ट्विट करत स्पष्ट केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.