Nashik News : त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट लवकरच उभारणार पूर्व दरवाजाला मंडप

कर्मचाऱ्यांना सेवा नियम लागू; विश्वस्त मंडळाची महिती

एमपीसी न्यूज – त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पुर्व दरवाज्याला लागून असलेल्या दर्शन रांगेच्या पटांगणात कायमस्वरूपी मंडप उभारण्यात येणार आहे तसेच कर्मचाऱ्यांना सेवा नियम लागू होतील, अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे. जवळपास अडीच कोटी रुपये खर्चून हा मंडप होणार आहे.

मंडप उभारणेसाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाची परवानगी विश्वस्त मंडळाने घेतली असून परवानगीत ज्या सूचना दिल्या आहे, त्या सुचनांच्या अधीन राहून मंडप उभारणीचे काम होणार आहे, या साठी लवकरच निविदा निघणार आहे. या सुविधेमुळे भाविकांच्या रांगेसाठी कायम स्वरूपी सुविधा उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, ट्रस्टने सर्व 114 कर्मचारी कायम केले असून सेवा नियम कर्मचारी वर्गासाठी लागू केले आहे. यामध्ये प्रशासकीय कारकुनी व शिपाई अशा तीन रँकचे कर्मचारी असून यात 20 महिला शिपाई आहेत.

यावेळी, राजाभाऊ जोशी व शंकर गमे हे दोन कर्मचारी निवृत्त झाले असल्याने त्यांना ट्रस्टचे अध्यक्ष न्या बोधनकर यांचे उपस्थितीत छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.