Nashik :नाशिक मध्ये पोलीस ठाण्यातच पोलीस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

एमपीसीन्यूज : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पोलीस (Nashik )अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी  झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

अंबड पोलीस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.

PCMC : भाजप खासदारांच्या निकटवर्तीयांना प्राणी सुश्रुषा केंद्राचे काम थेटपद्धतीने?

यामुळे नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडताच पोलिसांची मोठी धावपळ उडाली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.