PCMC : शहरात कर कक्षेत नसलेल्या अडीच लाख मालमत्ता?अर्थसंकल्पातून माहिती

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीत सर्वंकष मालमत्ता सर्व्हेक्षणाचे (PCMC)काम हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 5 लाख 47 हजार 545  मालमत्तांना क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामध्ये 1 लाख 62 हजार 328 आकारणी न झालेल्या मालमत्ता आढळून आलेल्या असून हे प्रमाणे 30% इतके आहे.
सर्व्हेक्षणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत आकारणी न झालेल्या मालमत्तांची संख्या सुमारे 2 लाख 50 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता अर्थसंकल्पात वर्तविण्यात आली आहे. या मालमत्ता कर कक्षेत आणल्यास 1200 कोटी पर्यंत उत्पन्नाची भर मालमत्ता करातून तिजोरीत पडणार आहे.

कर संकलन विभागामार्फत वसूलीकामी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन 2022-2023 मध्ये 811 कोटी वसूली करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात 15 फेब्रुवारी अखेर 755 कोटी उत्पन्न मिळाले आहे. मार्च अखेर 1 हजार कोटी वसूली उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.

Dehuroad : अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले साडेपाच लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज

स्थानिक संस्था कर विभागाकडे नोंदणी केलेल्या शहरातील व्यावसायिकांसाठी राज्य शासनाचे मान्यतेनुसार ‘अभय योजना’ लागू करण्याचे नियोजन आहे. त्याची अंमलबजावणी केल्यानंतर स्थानिक संस्था कर विभागाकडून सन 2024-25 या आर्थिक वर्षात अंदाजे सुमारे 400 ते 500 कोटी एवढ्या रकमेचा स्थानिक संस्था कर वसुल होईल. त्यामुळे महापालिकेच्या महसुली उत्पनात भरीव वाढ होईल. राज्य शासनाच्या मान्यतेने कर्ज घेण्याचे नियोजन आहे. त्याचे अनेक टप्पे असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे. बचत ठेवी देखील भरपूर असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.