Pimpri : शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प, 2911 कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी (Pimpri)आणि  मुळा या तीन नद्या वाहतात. या नद्यांचे  पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तिन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 2911 कोटींचा खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीमधील मुळा नदीच्या सुमारे 14.20 किलो (Pimpri)मीटर लांबीसाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा 750 कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात वाकड ते सांगवी फाटा पर्यंत 8.80 किलो मीटर लांबीसाठी 320 २० कोटी रक्कमेचा प्रकल्प सन 2024-25 याआर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे. पवना नदीच्या पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये असणाऱ्या सुमारे 24.40 किलो मीटर लांबीसाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा 1 हजार 484 कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा  प्रकल्प देखील सन 2024-25 या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे.

PCMC : शहरात कर कक्षेत नसलेल्या अडीच लाख मालमत्ता?अर्थसंकल्पातून माहिती

इंद्रायणी नदीच्या पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये येणाऱ्या सुमारे 20.60 किलो मीटर लांबीसाठी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा 1 हजार 107 कोटी रकमेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प देखील  या आर्थिक वर्षात हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पांपैकी मुळा नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी 200 कोटी रकमेचे कर्जरोखे (मनपा निधी ) उभारण्यात आले आहेत.  पवना व इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे. तीनही प्रकल्पांमुळे नदीचे प्रदूषण कमी होऊन नदीच्या जैवविविधतेत सुधारणा होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.