Pune: सरकारने गुंडांप्रमाणे भ्रष्ट अधिकारी व पोलिसांचीही परेड घ्यावी – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज –  पुणे पोलीस आयुक्तांनी अलिकडेच कुख्यात गुंडांची परेड (Pune) घेतली होती. तशीच  परेड भ्रष्ट अधिकारी व पोलिसांची काढावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली  आहे.

 

नाईक यांनी तसे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले (Pune) आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मध्यंतरी नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी कुख्यात गुंडांची परेड पुण्यात घेतली होती. पुण्यात  भरदिवसा होणारे खून, पोलीस कस्टडीत असतनाही दिल्या जाणाऱ्या धमक्या यावरून पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड काढत त्यांची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला.

 

Alandi: ह भ प डॉ नारायण महाराज जाधव यांचा एमआयटी महाविद्यालया कडून मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव

 

तसेच सरकारने प्रशासनात असणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची व पोलिसांची देखील अशीच परेड कढावी. बोरीवली येथील पोलीस उपनिरीक्षकाने दोन लाख रुपयांची लाच घेतली. तसेच मध्यंतरी लोणी पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी परस्पर विक्री केली. त्यांच्या या मनमानी कारभाराला आळा बसावा यासाठी सरकारनेही ठोस पावले उचलावीत, अशा अधिकाऱ्यांची परेड काढली तर नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल. तरी या मागणीचा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार कारावा, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.