Dapodi : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ अभियान

एमपीसी न्यूज- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. 25) शिवसेना पिंपरी विधानसभा आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या सहकार्याने शासन आपल्या दारी अभियान आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम श्री विठ्ठल तरुण मंडळ, दापोडी गावठाण सरकारी दवाखान्याजवळ होणार आहे. या अभियानात संजय गांधी योजना, श्रवण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्तीसाठी योजना, इतर योजनेचा लाभ एकाच ठिकाणी व एका दिवशी मिळणार आहे. सर्व शासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार असून लाभार्थी असलेल्या व्यक्तींचे प्रस्ताव लगेच मंजूर करण्यात येणार आहेत.

याबाबतचे माहितीपत्रक मंगळवारी (दि. २३) शिवसेना व युवा सेनेच्या वतीने दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, बोपखेलमधे वाटण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय नाना काटे, उपशहर प्रमुख तुषार भाऊ नवले, युवानेते गोपाळ मोरे, रवी कोवे, विभाग प्रमुख राजू सोलापुरे, चंद्रकांत शिंदे, उपस्थित होते. तरी सर्व नागरिकांनी या योजेनचा लाभ घ्यावा असे आवाहन युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले आणि विभागसंघटक निलेश हाके यांनी केले.आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.