Dapodi : नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त दापोडी येथे आरोग्य शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग, स्व. इंदिरा गांधी सांगवी रुग्णालय व ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग (Dapodi) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने  नागरी आरोग्य पोषण दिन (UHND) त्रिरत्न हॉल, दापोडी येथे उत्साहाने साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य वैद्यकिय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते झाले. ‘ह’ प्रभाग सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सांगवी रुग्णालय प्रमुख डॉ. तृप्ती सांगळे, आयएमए वुमन्स विंग चेअरमन डॉ. रितु लोखंडे, डॉ. शिवाजी ढगे जेष्ठ वैदयकीय अधिकारी, त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण पुणे विभागाचे विश्वस्त श्रीमती सुशीला कडलक उद्घाटनासाठी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून आकाशात फुगे सोडून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

Pune : तणावमुक्त जीवनासाठी विश्वशांती आवश्यक – राज्यपाल

नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त  शिबिरामध्ये खालील सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

• रक्तदाब तपासणी व उपचार

• गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी, स्तन कॅन्सर तपासणी, तोंडाचा कॅन्सर तपासणी.

• गरोदर माता तपासणी व उपचार

• बालकांची तपासणी, उपचार व लसिकरण

• किशोरवयीन मुला-मुलीची तपासणी व समुपदेशन

• रक्त तपासणी हिमोग्लोबिन, मधुमेह इ.

•डेंग्यू मलेरिया तपासणी

• क्षयरोग तपासणी व मार्गदर्शन

• कुष्ठरोगा विषयी मार्गदर्शन

• आहार व योगा या विषयी मार्गदर्शन

• कुटुंब नियोजन साधनां विषयी माहिती

• गर्भाशय मुख तपासणी (Pap smear)

• सरकारी योजनांची माहिती

• पाककला स्पर्धा

• आभा कार्ड

• CPR चे प्रात्यक्षिक

Pune : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

या शिबिरामध्ये डॉ. वैशाली भामरे, डॉ. करुणा साबळे, डॉ. शरद पोळे, डॉ. जयश्री शेलार, डॉ. गोविंद नरके, डॉ. वर्षा गवई (स्त्रीरोगतज्ज), डॉ. नेहा नाईक (बालरोगतज्ञ) डॉ. मोनाली क्षीरसागर ( भूलतज्ञ), डॉ. आकाश गिरबिडे, डॉ. स्नेहल अस्टूल, डॉ. सचिन लकडे, डॉ. तुषार मनतोडे (दंतचिकित्सक), डॉ. राजेश नायर डॉ. श्रुती श्रीराम श्रीमती अंजली नेवसे, श्री गणेश जवळकर व सांगवी रुग्णालय झोन मधील स्टाफ नर्स, ए.एन.एम. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट डेटा एन्ट्री ऑपरेटेर, एम.पी.डब्लू. टीबी. एच. व्ही, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आशा स्वयंसेविका, मदतनीस यांनी सहभाग घेतला.

सदर शिबिरामध्ये 200 हून अधिक रुग्णांनी व नागरीकांनी लाभ घेतला. दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी त्रिरत्न हॉल दापोडी येथे नागरी आरोग्य पोषण दिन(UHND ) शिबिर राबविण्यात येणार आहे.

इंडिअन मेडिकल असोशिएशन त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहाय्यक गण पुणे, स्नेह फाउंडेशन (NGO) संस्था, महिला आरोग्य समिती, बचत गट, अंगणवाडी सेविका (ICDS), आरोग्य मित्र फाउंडेशन या संस्थांच्या समन्वयाने व सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  गणेश जवळकर यांनी केले व आभार डॉ. वैशाली भांबरे यांनी (Dapodi) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.