Dapodi News : युवा सेनेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसीन्यूज : पिंपरी युवासेनेतर्फे गणेशनगर, दापोडी येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात 138 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

युवा सेनेचे पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांच्यावतीने शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

दापोडीतील ज्येष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना महिला आघाडी संघटिका सरिता साने, नगरसेवक राजू बनसोडे, युवती सेना प्रमुख प्रतीक्षा घुले, विभाग संघटिका शैला निकम, शीला जाधव, मनोज वाखारे, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, अक्षय गायकवाड, अविनाश जाधव, बाळा लांडे, शिवा काची, रवी नगरकर, संजय पिंपळे, शिवराज डिग्गीकर, दीपक शिंदे, मनोज काची, चिंचपा निंगडोळे, बुद्धीसागर गायकवाड, महेश बोधले, शहाजी वायदंडे, अजय कदम आदी उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी, नाडी तपासणी, फिजोथेरपी, रक्तदाब, दंत तपासणी, सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी आदी तपासण्या करण्यात आल्या.

डॉ. सबा खान, डॉ. अर्पिता परमार, डॉ. प्राजक्ता शिंदे, अल्फ्रेड ॲन्थोनी तसेच प्रतिक्षा माचकर, रोशनी जैन, शबनम शाह आदींचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.