Pimpri : शिवसेनेची ध्येयधोरणे घरोघरी पोहोचविण्यासाठी महिला सज्ज – सुलभा उबाळे

एमपीसी न्यूज – कोरोना काळामध्ये तत्कालीन (Pimpri) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदार कुटुंब प्रमुख या नात्याने जनतेची सेवा केली. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेत बरोबर घेऊन मोठी पदे दिली. परंतु काहींनी शिवसेनेला अडचणीत आणून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात फूट पाडली. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे घरोघरी पोचविण्यासाठी महिला सज्ज झाल्या आहेत, असे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या.

शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला आघाडी पदाधिकारी यांचा नियुक्ती पत्र वाटप समारंभ सेना भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन अहिर तसेच महिला आघाडी मावळ पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख लतिका पाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी सुलभा उबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रमुख शैला खंडागळे, शहर संघटिका अनिता तुतारे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, युवराज कोकाटे, माजी नगरसेविका रेखा दर्शिले, नितीन बोंडे आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी, चिंचवड, भोसरी मधील अनेक महिलांनी पक्ष प्रवेश केला.

NCP : शरद पवार गटाची कार्यकारिणी जाहीर

भोसरी विधानसभा संघटिका कल्पना शेटे, समन्वयक पिंपरी सुजाता काटे, गौरी घंटे, विभाग संघटिका सुजाता गायकवाड (Pimpri) (अंजठा नगर), उपविभाग संघटिका साधना वाघमारे (भोसरी), शाखा संघटिका वंदना बनसोडे (अंजठा नगर), पिंपरी विधानसभा संघटिका डॉ. वैशाली अभय कुलते, समन्वयक पिंपरी चिंचवड वैभवी घोडके, उपशहर संघटिका कामिनी मिश्रा, सुषमा शेलार, विभाग संघटिका संगीता भारती (संत तुकाराम नगर), पुनम रिठे (पिंपरी) चिंचवड विधानसभा संघटिका मंगल भोकरे, समन्वयक चिंचवड विधानसभा उषा आल्हाट, उपशहर संघटिका रजनी वाघ, योगिनी मोहन, ज्योती भालके, विभाग संघटिका कमळ गोडांबे (पिंपळे सौदागर), वंदना वाल्हेकर (वाल्हेकर वाडी), वैशाली काटकर (चिंचवड), अमृता सुपेकर (रहाटणी), गीता कुसाळकर (वाकड), उपविभाग प्रमुख सुनिता सोनवणे (रहाटणी), श्रद्धा शिंदे (काळेवाडी), कलावती नाटेकर (चिंचवड), वंदना खंडागळे (पिंपळे सौदागर) हर्षाली घरटे(वाल्हेकरवाडी) तस्लीम शेख (काळेवाडी) या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

संगिता परेश शाह, पुष्पा पाटील, राणी देवकर, रेहाना शेख, बालिका गुरव, प्रतीक्षा जाधव, खरात पाटील, आलिया शहा, वाल्या शहा, कविता जाधव, रोहिणी पाटील, लतिका कुंभार, किरण संहिता, सोनी वाघमारे, बालिका वाघमारे, समरिन भालेराव, मनीषा गडावर, अरूणा सुर्यवंशी, नविता शिंदे, राणी सुवासे, सुरेखा भवारे, मनीषा जाधव, श्रद्धा माडे, बेबी जगताप, सुजाता गायकवाड, वंदना बनसोडे, साधना वाघमारे आदींनी पक्ष प्रवेश केला. त्यांचे स्वागत शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.