NCP : शरद पवार गटाची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी( NCP )काँग्रेस (शरद पवार) गटाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देवेंद्र तायडे यांना तर सरचिटणीसपदी जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.

माजी नगरसेविका शकुंतला भाट आणि अशोक (NCP )तनपुरे यांची सरचिटणीसपदी वर्णी लागली. चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षपदी सागर चिंचवडे, प्रशांत कापसे यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी आणि भोसरी विधानसभेची जबाबदारी ज्ञानेश्वर आल्हाट यांना देण्यात आली.

Alandi : संजीवन समाधी सोहळ्यासाठी पीएमपीच्या 342 ज्यादा गाड्या

अरुण थोपटे यांची सेवादल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी नगरसेवक गणेश भोंडवे यांची मुख्य समन्वयक पदी तर माधव पाटील यांची मुख्य प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली. सविता खराडे, धीरज तमाचीकर, अमित तापकीर , अनिल भोसले , महेश इंगवले, सतीश भोईर ,माणिक जैद पाटील,अमोल गाडेकर, काशिनाथ बामणे, संदीप गायकवाड,गणेश भांडवलकर,विनोद धुमाळ ,मीना नाणेकर शशिकांत निकाळजे आणि दिलीप पानसरे यांची शहर उपाध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्रे देण्यात आली.

संघटक म्हणून राजू खंडागळे आणि विवेक विधाते यांची नियुक्ती झाली. तसेच विजय बाबर , योगेश सोनावणे, पोपट पडवळ, राहुल धनवे, अंबादास बेळसांगवीकर,उज्वला पोकळे,कमलेश वाळके, सिद्धार्थ गायकवाड, विजय अब्बड यांची शहर चिटणीस पदी वर्णी लागली. गणेश काळे यांना झोपडपट्टी सेल शहराध्यक्ष , अल्ताफ शेख यांना अप्लसंख्यांक सेल, ज्योती जाधव यांना अर्बन सेल, विजय कुमार पिरंगुट यांना उद्योग व्यापार सेल,वंदना आराख यांची असंघटित कामगार घरेलू महिला अध्यक्षपदी, अनिता गव्हाणे यांची पर्यावरण सेल अध्यक्षपदी , संदीप यशवंत शिंदे यांची कामगार सेल अध्यक्षपदी ,राहुल गोडसे यांची आयटी सेल शहराध्यक्षपदी, शौल कांबळे यांची ख्रिश्चन सेल आणि मयूर जाधव यांना सामाजिक न्याय सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले.

माधुरी रुबदी यांची ख्रिश्चन सेलच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राजरत्न शिलवंत यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. हेमंत बाकावडे , सुहास देशमुख , दीपक लांघी , डॉ. गुणवंत पाटील, योगेश शहा , प्रशांत बाबेल, देवा नखाते,चंद्रकांत जाधव यांची शहर कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.