Dapodi: साहेब, दादांना कमीपण येईल, असे पार्थ वागणार नाही; पार्थला संधी द्या-सुनेत्रा पवार

एमपीसी न्यूज – आजोबा शरद पवार आणि वडील अजित पवार यांना कमीपणा वाटेल, असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ वागणार नाहीत, असे सांगत त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी पार्थला संधी देण्याचे आवाहन नागरिकांना केले.

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आज (सोमवारी) दापोडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका स्वाती काटे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, कविता खराडे उपस्थित होत्या.

  • पार्थ हा शरद पवार आणि अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे. राजकीय बाळकडू त्याला घरातून मिळालं आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पार्थ पवार प्रयत्न करतील अशी आई म्हणून मला खात्री आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ याला उमेदवारी मिळावी ही लोकांची मागणी होती. त्यामुळे पार्थला उमेदवारी देण्यात आल्याचे सांगत तुम्ही पार्थला संधी द्या, असे आवाहन सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.