Lonavala: वॅक्स म्युझियममध्ये चोरी करणारे तिघे गजाआड; राजस्थानमधून घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज – येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये चोरी करत गल्ल्यामधील सुमारे दोन लाख रुपये रोख, दोन संगणकाचे माॅनिटर आणि एक एलईडी टिव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरुन राजस्थान येथे पोबारा केलेल्या तिघांना अटक करण्यात लोणावळा शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांपैकी दोन जणांनी वॅक्स म्युझियमच्या काॅपी शाॅपमध्ये पूर्वी काम केलेले असल्याने त्यांना याठिकाणची माहिती होती.

वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मोतीराम छत्राराम ओटावत (वय 22), हरिराम मोतीराम चव्हाण (वय 20) आणि शंकर चौहान (वय 23, सर्व राहणार दानवरली गाव, जिल्हा पाली राजस्थान) यांना याप्रकरणी अटक केले आहे.

  • 27 मार्च रोजी पहाटे अडीज-तीन वाजण्याच्या वरील तिन्ही आरोपीनी तोंडाला कापड बांधत बंद दरवाज्याच्या ग्रिलमधून आतमध्ये प्रवेश केला. कॅश काऊंटमधील दोन लाख रुपये रोख, दोन माॅनिटर आणि एक एलईडी टिव्ही चोरुन थेट राजस्थानला पोबारा केला होता.

या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील आणि स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड, वैभव सुरवसे, सामिल प्रकाश, राम जगताप यांच्या पथकाने सिसिटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवत राजस्थान गाठले. त्याठिकाणी तिनही आरोपीना एक लाख 42 हजार रुपयांची रोकड आणि एक माॅनिटर याच्यासह त‍ाब्यात घेतले.

याप्रकरणी तिन्ही आरोपीना अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.