Dapodi : दोन भावांनी पोलिसांना दिली वर्दी उतरवण्याची धमकी; 22 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चौकीत नेले. त्यावेळी दोघांनी चौकीमध्ये जमाव जमवून पोलिसांना वर्दी उतरण्याची धमकी दिली. याप्रकरणी 22 जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) रात्री अकराच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सार्वजनिक रस्त्यावर आणि पोलीस चौकीत घडली.

सुशील अशोक चव्हाण (वय 28), शुभम अशोक चव्हाण (वय २३), कल्पना अशोक चव्हाण (वय 40), कविता अशोक चव्हाण ऊर्फ जिनात हसीम शेख (वय 32), किरण विशाल ननावरे (वय 31), अशोक पाचू चव्हाण (वय 54), ललिता अशोक चव्हाण (वय 45) योगिता अशोक चव्हाण (सर्व रा. खडकी) जयेश विनोद चव्हाण (वय 22, रा. सांगवी), तेजस विनोद चव्हाण (वय 19, रा. सांगवी), दीपक महिपाल तुसाम (वय २३, रा. शिवाजीनगर), रोशन, अज्जू (पुर्ण नाव माहीती नाही, रा. संगमवाडी) आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांनी फिर्याद दिली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.७ ) रात्री अकराच्या सुमारास पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांना पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल आला. त्या कॉलवर मुंडे पोलीस शिपाई म्हेत्रे आणि बिरारीस यांच्यासोबत जात होते. त्यावेळी दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सार्वजनिक रस्त्यावर सुशील आणि शुभम यांचे भांडण सुरू होते. ते दोघे एकमेकांना बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना जवळच्या पोलीस चौकीत नेले. आरोपींनी चौकीजवळ बेकायदेशीरपणे जमाव जमवला.

तसेच पोलिसांना शिवीगाळ केली. तसेच जातीवाचक बोलल्याची खोटी तक्रार करून वर्दी उतरवण्याची धमकी पोलिसांना दिली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.