Moshi : वाळत घातलेल्या कपड्यांची ट्रॉली काढण्यास सांगितल्यावरून वाद; परस्परविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्यात वाळू घातलेली कपड्यांची ट्रॉली काढण्यास सांगितल्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. दोन्ही कुटुंबांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री साडेआठच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे घडली.

रामकृष्ण निवृत्ती आघाव (वय 55, रा. संतनगर, मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार हर्षद वासुदेव आडोळे (वय 26), कुंदन दशरथ वाघमारे (वय 23, दोघे रा. संतनगर, मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

  • यामध्ये रामकृष्ण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी हर्षद आणि कुंदन यांनी संतनगरमधील रस्त्यावर कपड्यांची ट्रॉली वाळत घातली होती. ट्रॉली रस्त्यात असल्याने रामकृष्ण यांनी ती बाजूला घेण्यास सांगितले. यावरून हर्षद आणि कुंदन या दोघांनी मिळून रामकृष्ण यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईपने डोक्यात मारले. यामध्ये रामकृष्ण जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्परविरोधात 23 वर्षीय महिलेने गुन्हा नोंदवला. त्यानुसार रामकृष्ण निवृत्ती आघाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांचा मित्र हर्षद हे दोघे कपडे वाळविण्याची ट्रॉली काढत होते. त्यावेळी त्यांच्या ट्रॉलीचा धक्का रामकृष्ण यांच्या मोटारीस लागला. या

  • वरून दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात रामकृष्ण यांनी महिलेचा विनयभंग केला. तसेच त्यांचा मित्र हर्षद याला शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.