Chikhali News : दत्ताकाका साने प्रतिष्ठानतर्फे पोलीस, सफाई कामगारांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड आणि दत्ताकाका साने प्रतिष्ठान यांच्यातर्फे व यश साने यांच्या पुढाकारातून शहरातील पोलिस कर्मचारी, सफाई कामगार व विकास अनाथ आश्रम येथे सॅनिटायझर, मास्क, ग्लोजचे वाटप करण्यात आले.

सध्या कोरोनाची दुसरी लाट शहरात आली आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून कोरोना योद्धयांना सॅनिटायझर, मास्क, ग्लोजचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार चिखली पोलीस, परिसरातील सफाई कर्मचारी आणि चिखली गावातील विकास अनाथ आश्रमातील मुलांना हे साहित्य वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड आणि दत्ता काका साने प्रतिष्ठान तर्फे आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले आहेत.

माजी नगरसेवक स्वर्गीय दत्ता साने यांचा समाजसेवेचा वारसा त्यांचे चिरंजीव व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने पुढे चालवीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.