Dehugaon : श्री तुकाराम महाराज बिज उत्सवा निमित्त वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – देहूगाव (Dehugaon) येथे बुधवारी (दि.27) संत श्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज बिज उत्सव साजरा होत आहे. बिजनिमित्त संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज मंदीर येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी सांप्रदायातील सदस्य सामान्य भाविक, वारकरी, महिला भगिनी मुले दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक हे मोठ्या संख्येने आप-आपली वाहने घेवून कुटूंबासह देहूगाव येथे येत असतात. त्यामुळे देहूगाव च्या परिसरात वाहतूक कोंडी होत असते.त्यामुळे बुधवारी देहुगाव व परिसरात वाहतुकीत सोमवार (दि.25) ते बुधवार (दि.27)बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड यांनी दिली आहे.

वाहतूक बदल पुढील प्रमाणे –

तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतूक विभाग अंतर्गत

1 ) देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथुन देहुगाव कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतूक बसेस व दिंडीतील वाहने वगळून)

2) महिंद्रा सर्कलकडून फिजित्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक /आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मागें डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. (Dehugaon)

3) तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगाव जाणारे रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

PCMC : शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन

पर्यायी मार्ग सदर मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

4) नाशिक पुणे हायवेवरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी

पार्क / कॅनबे चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग 1. सदर मार्गावरील वाहने हि मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग 2. सदर मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल- indurance चौक एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

5) देहू कमान ते 14 टाळकरी कमान (Dehugaon) ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद, खंडेलवाल चौक

6) ते देहू कमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद.

7) जुना पालखी मार्ग (कंद पाटील2 लोक चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) जाणारी वाहतूक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यांत येत आहे.

हा बदल सोमवारी दुपारी 12 पासून ते बुधवारी रात्री 9 वाजेपर्यंत राहणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीसाठी बंद राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.