Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 18 पॉझिटिव्ह रुग्ण; 18 रुग्णांना डिस्चार्ज

आजपर्यंत हद्दीत एकूण 446 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. ; 18 positive patients today in the cantonment Area; Discharge to 18 patients

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील थॉमस कॉलनी, मेन बाजार (वाघमारे बिल्डिंग ) शितला नगर नं. 1, आंबेडकर नगर, चिंचोली, पोर्टर चाळ या परिसरात आज, गुरुवारी एका दिवसात 18 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, आज 18 रुग्णांना उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आहे.

आजपर्यंत हद्दीत एकूण 446 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 18   नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे.

रुग्णवाढीचे प्रमाण झोपडपट्टी परिसरात जास्त आहे. त्याचबरोबर गावठाण भाग आणि बाजारपेठेतही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत एकूण 446 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 60 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

88 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटर येथे 31 रुग्ण उपचार घेत आहे.  हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 13 इतकी आहे.

दरम्यान,  18 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर आजपर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण 254 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता जोशी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.