Dehuroad : चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून कोसळला; चालक जखमी

एमपीसी न्यूज – चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरून पडला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पुनावळे पुलावर घडली. यामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुलावरील कठड्याला धडकला. कंटेनरचा वेग आणि वजन जास्त असल्याने कठडा तोडून कंटेनर पुलावरून खाली पडला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.