Pune : पन्नास हजारांची लाच घेताना समाजकल्याण विभागाचा उपायुक्त जाळ्यात

एमपीसी न्यूज- तपासणी अहवालावर अनुकूल शेरा देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना समाजकल्याण विभागाच्या उपायुक्ताला रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 21) करण्यात आली.

पुंजी सखाराम कवटे (वय 56, रा. वारजे) असे अटक करण्यात आलेल्या उपायुक्ताचे नाव आहे. याप्रकरणी 50 वर्षीय इसमाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिली होती

मिळालेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार यांची शिक्षण संस्था आहे. संस्थेमार्फत ते अनुदानित आश्रमशाळा चालवतात. पुंजी कवटे यांनी त्यांच्या शाळेची तपासणी केली होती. तपासणी अहवालावर अनुकूल शेरा देण्यासाठी पुंजी यांनी तक्रारदाराकडे 50 हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देताच त्याची खातरजमा करून त्यानुसार कारवाई करत शुक्रवारी सापळा रचून पुंजी याला 50 हजारांची लाच रंगेहाथ पकडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.