Chakan : चिंबळी फाटा येथून मायलेकी बेपत्ता

एमपीसी न्यूज- चिंबळी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतून गेल्या आठ दिवसांपूर्वी मायलेकी निघून गेल्या असून, त्या दोघी परत आल्या नसल्याने अद्याप त्या बेपत्ता झाल्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

सुरेखा दत्तात्रय गोपाळे ( वय – 38 वर्षे, ) व तिची चार वर्षाची कन्या अश्विनी दत्तात्रय गोपाळे ( दोघीही रा. चिंबळी फाटा, मूळ रा. आडगाव, ता. खेड,) असे बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहेत. सुरेखा हिचा भाऊ सतीश बारकू जगताप ( वय – 50 वर्षे, सध्या रा. चिंबळी फाटा, ता. खेड, मूळ रा. कशाळ, ता. मावळ,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरेखा ही घरात कोणाला काही न सांगता राहत असलेल्या चिंबळी फाटा येथील घरातून शनिवारी ( दि. 15 ) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान तिची चार वर्षांची कन्या अश्विनी हिला बरोबर घेऊन गेली आहे. तेव्हापासून त्या दोघी मायलेकी परत घरी आल्या नसल्याने त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात देण्यात आली. या मायलेकींबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी तातडीने चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क ( फोन न. 02135 – 249333 ) साधण्याचे आवाहन चाकण पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.