Thergaon: वाकड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज –  थेरगाव उपविभागास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्ती कामामुळे आज (शनिवारी) काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

थेरगाव उपविभागास पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रहाटणी, श्रीनगर, शिवराजनगर, जगताप डेअरी परिसर, लक्ष्मणनगर, गणेशनगर, थेरगाव परिसर, पिंपळे निलख, वाकड  काळेवाडी परिसराचा सकाळचा तसेच सायंकाळचा पाणीपुरवठा उशीरा तसेच कमी दाबाने होणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. दरम्यान, मागील 12 दिवसापासून विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.