Dehuroad Corona Update : दत्तवाडीत 3, तर शेलारवाडीत एका रुग्णाची नोंद; 34 रुग्णांना डिस्चार्ज

आजपर्यंत हद्दीत एकूण 714 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागला आहे. दोन दिवसांपासून नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट  होत असल्याचे दिसून येते. आज, सोमवारी शेलारवाडी येथे 1 आणि दत्तनगर येथे 3 अशा एकूण 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली.  तर आज, उपचार पूर्ण होऊन बरे झालेल्या 34 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आजपर्यंत हद्दीत एकूण 714 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 4 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 714 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यापैकी सध्या 36 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 39 रुग्णांना, हिंजवडी येथील विप्रो कोविड केअर सेंटर येथे एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

58 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आज 34 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 561 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 19 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.