Dehuroad Corona Update: कॅन्टोन्मेंट हद्दीत आज 8 नवीन रुग्णांची नोंद ; दोघा जेष्ठांचा मृत्यू

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, मंगळवारी चिंचोली आणि किन्हई येथे प्रत्येकी 2 तर झेंडेमळा, लक्ष्मीपूरम सोसायटी, बरलोटा नगर, मेन बाजार येथील प्रत्येकी एक अशा एकूण 8 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर श्रीकृष्ण नगर आणि गांधीनगर येथील दोन पुरुषांचा अनुक्रमे 18 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबरला कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1093 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, मंगळवारी रात्री  आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 8 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1093 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 973 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 91 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 7 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 23 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 2 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच पुणे रेल्वेच्या कोविड सेंटरमध्ये एका रूग्णावर उपचार सुरु आहेत.

होम आयसोलेशनमध्ये 59 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, श्रीकृष्ण नगर येथील 65  वर्षांच्या पुरुषासह गांधीनगर येथील 95  वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 29 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.