Dehuroad Corona Update : श्रीविहार सोसायटी येथे तीन नव्या रुग्णांची नोंद ; सात रुग्णांना डिस्चार्ज
एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, सोमवारी श्रीविहार सोसायटी येथे तीन नव्या रुग्णांची नोंद झाली नाही. तर कोरोनामुक्त झालेल्या एकूण सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हद्दीत सध्या अवघे 5 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅंटोन्मेंट प्रशासनाकडून देण्यात आली.
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सोमवारी सायंकाळी साडे सात वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस दिला आहे. या अहवालानुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1329 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यातील एकूण 1289 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
होम आयसोलेशन मधील रुग्णांची संख्या 3 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. सध्या फक्त 1 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.