Pune News : पर्यटकांसाठी खूशखबर… उद्यापासून सिंहगड किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले

एमपीसी न्यूज – मागील दोन महिन्यापासून बंद असणारे सिंहगड किल्ल्याचे दरवाजे अखेर पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहेत. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेश काढला असून मंगळवारपासून पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला खुला होणार आहे.

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर मागील नऊ महिन्यांपासून सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद केला गेला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी नियम शिथिल करत ट्रेकिंगसाठी परवानगी देण्यात आली होती.

परंतु गडाचे मुख्य दार पर्यटकांसाठी बंद होते. गड बंद असल्यामुळे पर्यटकांना गडावर घेऊन जाणारे, चहा भजी विकणारे, दही ताक विकणाऱ्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्या सहीत सिंहगड किल्ला सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गडाचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a6eda45d292264',t:'MTcxNDEzODIzOC4xMDAwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();