Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 7 रुग्णांना डिस्चार्ज; 3 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 157 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनातून बरे झालेल्या 7 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

आजपर्यंत हद्दीत एकूण 1130 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमे अंतर्गत एकूण 157 रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 1130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आजपर्यंत एकूण 1018 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 82 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी सध्या 10 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 38 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेशनमध्ये 34 रुग्ण आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या आता 30 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.