Dehuroad Crime News : देहूरोड पोलिसांची पान टपरीवर कारवाई

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित गुटखा विक्रीप्रकरणी देहूरोड पोलिसांनी मुकाई चौकातील एका पान टपरीवर कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 27 हजार 40 रुपये किमतीचा गुटखा जप्त केली आहे. ही कारवाई गुरूवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रुपाराम कसाराम चौधरी (वय 36, रा. किवळे, देहूरोड), सवाईराम कोजारामजी देवासी (वय 27, रा. शिरगाव, मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार वसीम महंमद शेख यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीलनुसार, आरोपींनी त्यांच्या पान टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठा करुन ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी टपरीवर कारवाई करत 27 हजार 40 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.