Dehuroad : तळवडे येथील कंपनीत साहित्य चोरी

हा प्रकार रविवारी (दि. 16) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास उघडकीस आला. : Material theft in a company at Talwade

एमपीसी न्यूज – तळवडे परिसरातील एका कंपनीत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 33 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 16) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास उघडकीस आला.

याप्रकरणी प्रणव सावता गिड्डे (वय 25, रा. कासरवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणव यांची तळवडे येथे भारत वजन काट्याच्यामागे कंपनी आहे. त्यांची कंपनी 24 जुलै पासून 16 ऑगस्ट पर्यंत बंद होती.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मोकळ्या जागेत ठेवलेले सीओ 2 मशीन, आर्क मशीन, सात इंची ग्राइंडर, चार इंची ग्राइंडर, कटिंग मशीन असे 33 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.