Dehuroad : देवदर्शनासाठी शेजा-यासोबत गेलेल्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – देवदर्शनासाठी शेजारी राहणा-या व्यक्तीसोबत देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेचा शेजा-याने गाडीत अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी बारा ते रात्री आठ या वेळेत पिंपळे सौदागर, कार्ला लेणी ते मुकाई चौक या दरम्यानच्या प्रवासात घडली.

याप्रकणी 33 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाळासाहेब शेंडगे (वय अंदाजे 37, रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी शेजारी राहतात. मागील काही वर्षांपासून ते एकमेकांना शेजारी राहत असल्याने ओळखत होते. रविवारी आरोपीने कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. त्याने पीडित महिलेला येण्याचे विचारले. महिला तयार झाली. दुपारी बाराच्या सुमारास ते पिंपळे सौदागर येथून निघाले. दुपारी कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेऊन परत आठच्या सुमारास सम्राट चौकात आले. दरम्यानच्या प्रवासात आरोपीने पीडित महिलेशी कारमध्ये अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. यावरून महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा आज (मंगळवारी) सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.