Dehuroad : गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारले जोडे

NCP activists beat up the image of Gopichand Padalkar

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.

येथील सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव यांनी पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा कठोर शब्दात निषेध केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, महिला अध्यक्षा शितल हगवणे यांनीही तिखट शब्दात पडळकर यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला.

यावेळी देहुरोड कॅंन्टोंन्मेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष ॲड. प्रवीण झेंडे व माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, महिला जिल्हा सरचिटणीस राजश्री राऊत, मंसूरबी काझी,, रंजना सपकाळे, सविता जाधव, हेमा रेड्डी ,सुनीता विश्वकर्मा, बॉबी डिका, युवक अध्यक्ष सचिन भुंबक, अल्पसंख्यांक अध्यक्ष शंकर स्वामी, ॲड. जालिंदर राऊत, गणेश कोळी, अँथोनी स्वामी, सतीश भेगडे, संतोष भोंडवे, नंदकुमार काळोखे, तानाजी काळभोर, किशोर गाथाडे, अभिषेक म्हसे, सत्यम मोरे, अशपाक शेख, समीर सतेलू, धनराज शिंदे, तरलोचन रत्तु , रेणू रेड्डी व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.