Dehuroad News : पदोन्नती आरक्षण रद्दच्या निर्णयाविरोधात ‘आरपीआय’चे आंदोलन

एमपीसीन्यूज : मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात मागासवर्गीय समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या निर्णयाविरोधात देहूरोड शहर आरपीआय ( आठवले गट) च्या वतीने आज, शनिवारी आंदोलन करण्यात आले.

मागासवर्गीय समाजासाठी अन्यायकारक ठरणारा हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली. तसेच याबाबतचे निवेदन देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांना देण्यात आले.

देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौक येथे आरपीआयचे शहराध्यक्ष सुनील गायकवाड यांच्या नेतुत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब भागवत यांच्यासह राहूल गायकवाड, सिध्दार्थ चव्हाण, इंद्रपालसिंग रत्तू, बाबू दूधघागरे, सुरेश गायकवाड, शंकर दोडमणी, पी.आर. चव्हाण, भिमशक्ती संघटनेचे महेश गायकवाड, अशोक चव्हाण, चंद्रभान गायकवाड, बुध्द विहार ट्रस्टचे सुनिल कडलक, आदींनी मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणाऱ्या निर्णयाचा निषेध नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.