Dehuroad News : महाराष्ट्रासाठी तातडीने कोरोना प्रतिबंधक लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करा : देहूरोड शिवसेनेची मागणी

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात कोरोना लस तयार होते पण महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांना ही लस मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोना लस उपलब्ध करण्याची मागणी शिवसेना देहूरोड शहर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

यासंदर्भात शिवसेनेच्यावतीने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनाची तर देहूरोड येथील तलाठी कार्यालयात देण्यात आली.

यावेळी शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शहरप्रमुख भरत नायडू, देवा कांबळे, सुनील चव्हाण आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना लसीचा तुटवडाही जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेसाठी तातडीने लस उपलब्ध करावी. त्याचबरोबर रेमडेसीविर इंजेक्शनचा पुरवठाही तातडीने करावा,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.