Dehuroad News : किवळे-दत्तनगरमध्ये भुयारी केबल टाकण्याचे काम सुरु

माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर आणि माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या पाठपुराव्यामुळे किवळे- दत्तनगर या भागात महावितरणकडून भुयारी विद्युत केबल आणि डीपी बसविण्याच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला.

या कामासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि महावितरण कार्यालयात यापूर्वी निवेदने दिली होती. तसेच आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. याबाबत निगडी-प्राधिकरणातील महावितरण कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.

त्यानुसार आता  पिंपरी चिंचवड महापालिका आणि महावितरण यांच्यावतीने दत्तनगर परिसरात भुयारी केबल टाकणे व डीपी बसविण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांची विजेच्या समस्येपासून सुटका होणार असल्याची माहिती मनोज खानोलकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.