Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला देहूरोड (Dehuroad ) पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता देहूरोड येथे करण्यात आली.

अरबाज फारुख शेख (वय 23, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार निलेश जाधव यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अरबाज शेख याला एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता देहूरोड येथे आला.

Pune : सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

याबाबत माहिती मिळाली असता देहूरोड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता (Dehuroad) आढळून आला. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.