Dehuroad : Dehuroad : गुन्हे शाखेकडून तीन पिस्टल जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख 54 हजार 500 रुपयांचे तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई रावेत येथे बुधवारी (दि,. 18) करण्यात आली.

मनोज विष्णू जगताप (वय 20, रा. हडपसर, मूळ रा. अहमदनगर), जॉन काशिनो परेरा (वय 31, रा. नालेगाव वाघगल्ली, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दोघेजण संशयितरित्या थांबले असून, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख 54 हजार 500 रुपये किमतीचे तीन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.