Dehuroad : रमजान ईद निमित्त मित्राच्या घरी जाणा-या दोघांना टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज – रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच जेवणासाठी जात असलेल्या दोन मित्रांना तेरा जणांच्या टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी पाचच्या सुमारास गांधीनगर पाण्याच्या टाकीजवळ देहूरोड येथे घडली.

ऋषिकेश उर्फ शे-या राजू अडागळे (वय 19), आकाश आर्मूगन पिल्ले (वय 19), फिरोज मुजावर, दीपक पांडे, मॉन्टी, प्रकाश कन्नमूर्ती, मट्टी, सादिक शेख व अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रवी गोरख सकट (वय 30) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान ईद निमित्त रवी त्यांचा मित्र तुकाराम गराडे यांच्यासोबत राजू शेख यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी तसेच जेवणासाठी जात होते. वाटेत आरोपींनी दोघांना अडवले. ऋषिकेश याने रवी यांच्या दुचाकीला लाथ मारली. याचा जाब विचारला असता आरोपींनी रवी आणि तुकाराम यांना कोयता आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी रवी यांची पत्नी आणि मुलगी आल्या असता आरोपींनी त्या दोघींनाही मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.