Dehuroad : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिरासह ऑनलाईन नोकरी महोत्सवाला प्रतिसाद

Response to Online Job Festival with Blood Donation Camp of NCP

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज लक्षात घेऊन देहूरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेल मावळ तालुका व पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शिबिरात 30 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, तर ऑनलाईन नोकरी महोत्सवात सुमारे 50 बेरोजगार तरुण तरुणींनी अर्ज भरले.

देहूरोड येथील शुभश्री हॉस्पिटल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते बेरोजगारांचे ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले. 

यावेळी देहुरोड शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विजय चौधरी, तळेगावचे नगरसेवक अरुण माने,  डॉ. राजेंद्र येळवंडे, देहुरोड कॅंन्टोंन्मेंट बोर्ड माजी उपाध्यक्ष ॲड. प्रवीण झेंडे व यदूनाथ डाखोरे, माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, महिला अध्यक्षा शितल हगवणे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, अतुल मराठे, महिला जिल्हा सरचिटणीस राजश्री राऊत, रंजना सपकाळे, सविता जाधव, लता कांबळे, युवक अध्यक्ष सचिन भुंबक, अल्पसंख्यांक अध्यक्ष शंकर स्वामी, अँड. जालिंदर राऊत, धनंजय मोरे, संतोष भोंडवे, रफीक शेख, गणेश कोळी, किशोर जगताप, ॲथोनी स्वामी, सतीश भेगडे, नंदकुमार काळोखे, तानाजी काळभोर, किशोर गाथाडे, अशपाक शेख, समीर सतेलू, धनराज शिंदे, उद्योजक पै. धनंजय सावंत, विक्की जाधव, अक्षय वाघमारे, बंटी गगनमाले, नकुल फाले, बापू वाघ

तसेच शिवसेना माजी शहर प्रमुख रमेश जाधव,  काँग्रेसचे शहराध्यक्ष- नगरसेवक हजिमलंग मारीमुत्तू व देवा कांबळे, चंदू महासे, सागर मुंडासं आदी मान्यवरांनी या कार्यक्रमला भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.