Hadpsar: ग्लायडिंग सेंटर येथील गोडाऊनमध्ये होणार कोविड केअर सेंटर

The Covid Care Center will be in the godown at the Gliding Center

एमपीसी न्यूज – हडपसर ग्लायडिंग सेंटर येथील गोडाऊनमध्ये तात्पुरते कोविड चाचणी व केअर सेंटर सुरू करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला पुणे महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्य अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

हडपसर परिसरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्लायडिंग सेंटर येथील गोडाऊनमध्ये कोविड -१९ चे चाचणी केंद्र व कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी महापालिका आयुक्त  शेखर गायकवाड यांना पत्र पाठवून मागणी केली होती.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांना या भागातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच आवश्यकतेनुसार साधनसामग्री व कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

ग्लायडर सेंटर येथे कोविड चाचणी केंद्र व कोरोना केअर सेंटर सुरू झाल्यास हडपसर परिसरातील कोरोना बाधितांसाठी चांगली सोय उपलब्ध होऊ शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.