Delhi : दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या (Delhi) उपस्थितीत  दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140  वी जयंती साजरी करत असताना , कार्यक्रमासाठी सदनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता.ही बाब महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी निदर्शनास आणून दिली.या कृत्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.

या घटनेविषयी ट्वीट करत रोहित पवार म्हणाले,  सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना  महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भानदेखील सरकारला राहिले नाही.

Pune : जादा परतावा मिळेल सांगून 24 जणांची फसवणूक

एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधताना या घटनेवर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले ,सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आमच्यासाठी पूजनीय आणि आदरणीय आहेत. त्यांच्याविषयीचा आदर प्रत्येक देशवासीयांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचा अनादर होणार नाही. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असून ते याबाबतचा खुलासा करणार आहेत. शेवटी अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले हे आमच्यासाठी फार आदरास्थानी (Delhi) आहेत.”

दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र  सदनाच्या दर्शनी भागात पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा जिना असून त्याच्या शेजारी हे पुतळे पूर्वीपासून ठेवण्यात आले आहेत. सावरकरांची जयंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरी होणार असल्यामुळे जिन्याचे दोन्ही कठडे व भिंत फुलांनी सजवली होते.

भिंतीसमोर सावरकरांची मूर्ती ठेवण्यात आली होती. सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळय़ाच्या जागी मोठय़ा समया ठेवलेल्या होत्या. शिवाय, मान्यवरांची आसनव्यवस्थाही होती. कोणालाही अडचण होऊ नये म्हणून दोन्ही पुतळे हटवण्यात आले होते, असे सांगण्यात आले.

सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी आलेल्या लोकांनी पुतळय़ाशेजारी पादत्राणे काढले तर तेही योग्य झाले नसते. त्यामुळे पुतळे थोडे दूर ठेवण्यात आले होते. कार्यक्रम झाल्यावर ते पुन्हा मूळ जागी ठेवले गेले, असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.