Delhi : दिल्लीत एका फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – दिल्लीमध्ये आज सकाळी एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीस बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. या भीषण आगीमधून शेकडो लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमधील अनाज मंडीतील एका फॅक्ट्रीला आज सकाळी अचानक आग लगाली. फॅक्ट्रीमध्ये सकाळी कामगार झोपले असताना अचानक आग लागली. यात अनेकांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घेटनेत मृत्यू झालेले कामगार बिहार आणि उत्तरप्रदेशमधील आहेत. यात आतापर्यंत 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून हा मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीत जखमी झाल्यानं सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळावर झाले आहेत. या भीषण आगीमधून शेकडो लोकांना वाचवले असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे, असे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यानी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत या दुर्घेटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे. ही दुख:द घटना घडली असून मदत आणि बचावकार्य सुरू आहेत, असे केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.