Pimpri : दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांस तात्काळ 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी-विठ्ठल कळसे

एमपीसी न्यूज – दापोडी येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेला अग्निशामक दलाच्या जवान व ठेकेदाराचा सामान्य मजूर यांच्या कुटुंबीयांस तात्काळ 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि अधिकारी, ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कळसे यांनी केली आहे.

या मागणीचे पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.