Kamshet : सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आईस्क्रीम खाण्याचे आमिष दाखवून एका सहा वर्षांच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.06/12/2019 रोजी) सायंकाळी सातच्या सुमारास कामशेत गावचे हद्दीत कुसगाव खुर्द रोडलगत असणाऱ्या न्यू गगन लाईफ बिल्डिंगजवळील शेतात घडली.

याप्रकरणी मुलाच्या चोवीस वर्षीय आईने कामशेत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अहमद हमीद शेख (रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी अहमद शेख याने शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित मुलाला आईस्क्रीम खाण्याचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून कामशेत गावचे हद्दीत कुसगाव खुर्द रोडलगत असणाऱ्या न्यू गगन लाईफ बिल्डिंगजवळील शेतात घेऊन गेला आणि तेथे मुलावर अत्याचार केले.

याप्रकरणी मुलाच्या आईने शनिवारी (दि.07/12/2019 रोजी) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अहमद शेख याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम एस गायकवाड हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.