Delhi news: पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने निधी द्यावा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

मावळ लोकसभा मतदारसंघात  ऐतिहासिक कार्ला लेणी, लोहगड ,तुंग, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत.  या किल्ल्याची पुरातत्व विभागामार्फत सुधारणा करणे आवश्यक आहे

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात याव्यात जेणेकरून देशविदेशातून पर्यटकांचा ओघ वाढेल आणि त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

खासदार बारणे म्हणाले, मावळ ही ऐतिहासिक भूमी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात  ऐतिहासिक कार्ला लेणी, लोहगड ,तुंग, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत.  या किल्ल्याची पुरातत्व विभागामार्फत सुधारणा करणे आवश्यक आहे.  ही सुधारणा झाल्यानंतर किल्ल्यावरील पर्यंटकामध्येही निश्चित वाढ होईल.

अनेक भारतीय पर्यटनासाठी विदेशात जातात. आपल्या भारतामध्ये ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी आर्थिक साहाय्य देऊन त्या पर्यंटनास्थळांचा विकास करावा. त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच विदेशी पर्यटक देखील भारतात पर्यटनासाठी येतील. स्थानिक लोकांना रोजगार मिळेल युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, असेही खासदार बारणे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.