Delhi news : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

एमपीसी न्यूज-माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण (वय 97) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले (Delhi news) आहे. दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.
शांती भूषण हे 1977 ते 1979 पर्यंत सरकारमध्ये कायदा मंत्री होते. भ्रष्टाचार आणि नागरी स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेक कायदेशीर लढाया लढल्या. अनेक जनहित याचिकाही त्यांनी दाखल केल्या होत्या. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
वकिलीबरोबर ते राजकारणातही सहभागी झाले होते.आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य होते. मात्र काही काळाने ते त्यातून बाहेर पडले.
1980 मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ नावाची प्रसिद्ध एनजीओ स्थापन केली. या एनजीओच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वाच्या जनहित याचिका सुप्रीम कोर्टात (Delhi news) दाखल केल्या.