Solanki Complex : तळेगाव येथील सोलंकी कॉम्प्लेक्स सहकारी हाऊसिंग सोसायटीची निवडणूक प्रक्रीया थांबविण्याची मागणी

एमपीसी न्यूज  – तळेगाव दाभाडे मधील यशवंतनगर परिसरातील सोलंकी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था (Solanki Complex) मर्यादीत यांची येऊ घातलेली सोसायटी निवडणूक प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी, स्नेहा निलेश माहुलकर यांनी मावळचे सहायक निबंधक मिलींद सोबळे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे.

 हे निवेदन देत असताना माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक तसेच स्नेहा निलेश माहुलकर यावेळी उपस्थित होते.

अर्जात म्हटले आहे की, निलेश बाळकृष्ण माहुलकर यांची यशवंतनगर येथील सर्वे क्रमांक 514 व 515 अशी 37 ते 45 प्लॉटची सर्वे क्रमांक 409 हि वडिलोपार्जीत जमीन 1994 रोजी विकासक नारायण सोलंकी व जगदिश सोलंकी यांना विकलेली आहे. तेथे विकासकाने सोलंकी कॉम्प्लेक्स उभे केले, मात्र यावेळी विकासकांनी खरेदी खतावरील एकाही अटीचे पालन केलेले नाही. याप्रकरणी माहुलकर यांनी वडगाव मावळ न्यायालयात धाव घेतली होती, त्यानुसार कोर्टात याप्रकरणी (Solanki Complex) खटला सुरु आहे.

प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील सोलंकी कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्थेत निवडणूक घेण्याची तयारी सुरु आहे. तरी न्यायालयातील दावे निकाली लागेपर्यंत सोसायटीसंदर्भात कोणतेही निर्णय व निवडणूका घेतल्या जाऊ नयेत. याबरोबरच सोलंकी कॉप्लेक्स सहकारी संस्थेची रीतसर नोंदणी झाल्याचे कोणतेही पुरावे सोलंकी यांनी माहुलकर यांना अद्याप दिलेले नाहीत.

सद्गुरू भक्ती हीच परमेश्वर भक्ती – ह.भ.प. बालाजी महाराज कुलथे

या शिवाय सोसायटीमध्ये माहुलकर यांचे दोन फ्लॅट व 3 गाळे असताना देखील त्यांचा नोंदणी प्रक्रियेत कोणताही सहभाग विकासकाने नोंदवलेला नाही. तशी कागदपत्रेही त्यांना देण्यात आलेली नाहीत.  तळेगाव नगरपालिकेमध्येही माहुलर यांनी चौकशी केली असता सोसायटी संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले.

तरीसुद्धा आजपर्यंत सोसायटीने माहुलकर यांच्याकडून (Solanki Complex) अनेकदा मेंन्टेन्स घेतला आहे. त्याची कोणतही पावती किंवा पुरावा दिलेला नाही. तसेचसोसायटीच्या सभासदांना येणाऱ्या कराच्या पावतीवर अजुनही सोलंकी यांचेच नाव असून सोसायटी नक्की स्थापन झाली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सोसायटीची येऊ घातलेली निवडणूक त्वरीत रद्द करावी तसेच सदस्याकडून,  बिल्डर कडून दिलेल्या निधीच्या संदर्भात, वैद्य हिशोबाची यादी जमा व खर्च , प्रत्येक महिना,  तारखेनुसार ऑक्टोंबर 2017  ते  ऑक्टोंबर 2022 या कालावधीतील नावानुसार, वर्गानुसार , सर्व पावत्या सकट माहिती कळवण्यात यावी, अशी मागणी अर्जाद्वारे स्नेहा निलेश माहुलकर यांनी मावळ सहायक निबंधक यांना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.