Khed : बस अडवून तरुणाची चालक, वाहकास मारहाण

एमपीसी न्यूज – राज्य परिवहन महामंडळाची (Khed) बस अडवून तरुणाने चालक आणि वाहकाला शिवीगाळ करत बसचा वायपर तोडून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी साडेसात वाजता खेड तालुक्यातील शिवेगावजवळ घडली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय लिंबा भोकटे (वय 39, रा. खरपुड, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुलदीप किसन शिंदे (वय 26 रा. गडद, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aundh News: प्लॅन मंजूर नसताना जिल्हा रुग्णालयाच्या आवारात इमारतीचे बांधकाम – लक्ष्मण जगताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राज्य परिवहन महामंडळात (Khed) वाहक म्हणून काम करतात. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ते चालक विजयकुमार रामदास जगदाळे यांच्यासोबत प्रवाशांना घेऊन जात असताना शिवेगावजवळ आरोपीने त्याची दुचाकी बसला आडवी लावली. फिर्यादींना शिवीगाळ करून बसच्या समोरील वायपर तोडून त्याने मारहाण केली. त्यांनतर फिर्यादीस धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.