Pune : देवेंद्र फडणवीसांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा  : शरद पवार 

एमपीसी न्यूज : मागील काही महिन्यात राज्यातून 6 हजार 889 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्या सर्वांचा शोध राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतला पाहिजे. इतर बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय योजना केले पाहिजेत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेत टोला लगावला.

India News : पद्म पुरस्कारांसाठी नामांकने पाठविण्यास 15 सप्टेंबर पर्यंत मुदत

यावेळी शरद पवार म्हणाले की,23 जानेवारी 2023 ते 23 मे 2023 या कालावधीत पुण्यातून 967, ठाण्यातून 721, मुंबई 738 आणि सोलापुरातून 62 मुली अथवा महिला बेपत्ता झाल्या आहेत. एकूण 2 हजार 458 महिला सहा महिन्यांच्या कालावधीत बेपत्ता झाल्या आहेत.

तर बुलढाणा, धुळे, पुणे (Pune) ग्रामीण, वाशिम, रायगड, अमरावती, नांदेड, बीड, चंद्रपूर, जळगाव, नंदूरबार भंडारा रत्नागिरी आणि गोदिंया या 14 जिल्ह्यातून सहा महिन्यांत 4 हजार 431 महिला किंवा मुली बेपत्ता झाल्यात आहे.

या गोष्टीकडे गृहमंत्र्यांनी गांभिर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.